मराठी वर्णमाला MCQ Quiz in தமிழ் - Objective Question with Answer for मराठी वर्णमाला - இலவச PDF ஐப் பதிவிறக்கவும்

Last updated on Apr 15, 2025

பெறு मराठी वर्णमाला பதில்கள் மற்றும் விரிவான தீர்வுகளுடன் கூடிய பல தேர்வு கேள்விகள் (MCQ வினாடிவினா). இவற்றை இலவசமாகப் பதிவிறக்கவும் मराठी वर्णमाला MCQ வினாடி வினா Pdf மற்றும் வங்கி, SSC, ரயில்வே, UPSC, மாநில PSC போன்ற உங்களின் வரவிருக்கும் தேர்வுகளுக்குத் தயாராகுங்கள்.

Latest मराठी वर्णमाला MCQ Objective Questions

Top मराठी वर्णमाला MCQ Objective Questions

मराठी वर्णमाला Question 1:

'मुलांनी' या शब्दात ______.

(a) 'मु' हे एक अक्षर आहे

(b) 'मु' हे एक ध्वनिचिन्ह आहे

(c) 'मु' हा एक मूलध्वनी आहे

(d) म् व उ हे मूलध्वनी आहेत

  1. (a) व (d) बरोबर, (b) व (c) चूक
  2. (a), (b) व (d) बरोबर, फक्त (c) चूक
  3. फक्त (a) बरोबर, (b), (c) व (d) चूक
  4. (b) व (c) बरोबर, (a) व (d) चूक

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : (a), (b) व (d) बरोबर, फक्त (c) चूक

मराठी वर्णमाला Question 1 Detailed Solution

उत्तर- (a), (b) व (d) बरोबर, फक्त (c) चूक

'मुलांनी' या शब्दात-

(a) 'मु' हे एक अक्षर आहे, (b) 'मु' हे एक ध्वनिचिन्ह आहे, (d) म् व उ हे मूलध्वनी आहेत.

(c) 'मु' हा एक मूलध्वनी आहे हा पर्याय चुकीचा आहे कारण मूल या शब्दामधील मू या अक्षराची फोड म् व उ याप्रमाणे होऊन हे मूलध्वनी आहेत.

मराठी वर्णमाला Question 2:

कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारात मोडत नाही?

  1. ग्
  2. क्
  3. ख्
  4. च्

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : च्

मराठी वर्णमाला Question 2 Detailed Solution

योग्य उत्तर च् आहे.

  • जिभेचा मागील भाग हा वर उचलून पडजिभेच्या पुढील भागाला म्हणजेच कंठाला स्पर्श करतांना ज्या वर्णाचा उच्चार होतो, त्यांना 'कंठ्य वर्ण' म्हणतात.
  • अ, आ हे स्वर आणि क् , ख् , ग् , घ् , ‌‌‍‍ङ् , ह् ही व्यंजने कंठ्य वर्ण आहेत.

मराठी वर्णमाला Question 3:

पुढीलपैकी कोणता अर्धस्वर नाही?

  1. र्
  2. व्
  3. ज्
  4. ल्

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : ज्

मराठी वर्णमाला Question 3 Detailed Solution

उत्तर- ज् हा अर्धस्वर नाही. ज् या वर्णांचा उच्चार तालव्य आणि दंततालव्य असा दुहेरी होतो.

Important Points

अर्धस्वर - अर्धस्वर व्यंजन ही एकूण चार आहेत. स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य्, र्, ल्, व् असा आहे. य्, र्, ल्, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ, ऋ, लृ, उ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात.

तालव्य वर्ण - जिभेचा स्पर्श वरच्या हिरडीवर होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना तालव्य वर्ण म्हणतात.

उदा. च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्, श्

दंततालव्य वर्ण - कठोर टाळूच्या दातांकडील सरबरीत आणि फुगीर असा जो भाग आहे त्याला वत्स असे म्हणतात आणि या भागात उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना दंततालव्य वर्ण म्हणतात.

च्, छ्, ज्, झ् या वर्णांचा उच्चार तालव्य आणि दंततालव्य असा दुहेरी होतो.

मराठी वर्णमाला Question 4:

अनुनासिक वर्ण ओळखा. 

  1. ड् 
  2. अ 
  3. ञ्
  4. ज्ञ 

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : ञ्

मराठी वर्णमाला Question 4 Detailed Solution

अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केला जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात. उदा. ङ्म्.

ञ् हा अनुनासिक वर्ण आहे.

 Additional Informationवर्ण - आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात.

मराठी भाषेतील वर्णमालेत एकूण ४८ वर्णांचा समावेश होतो. मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत १२ स्वर अधिक इग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ऑ हे स्वर मिळून १४ स्वर अधिक दोन स्वरादी अधिक ३४ व्यंजन असे एकूण ५० वर्ण दिले आहेत. परंतु आयोगाने वर्णमालेतील एकूण वर्ण किती याचे उत्तर ४८ असे दिले आहे.

हा एक स्वर आहे, ज्ञ हे एक संयुक्त व्यंजन आहे आणि ड् हे स्पर्श व्यंजन आहे.

मराठी वर्णमाला Question 5:

पुढीलपैकी तालव्य वर्णाने सुरु होणारा शब्द निवडा.

  1. चाचणी 
  2. चवड 
  3. चहा 
  4. चळवळ 

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : चहा 

मराठी वर्णमाला Question 5 Detailed Solution

चहा हा तालव्य वर्णाने सुरु होणारा शब्द आहे तर चाचणी, चवड, चळवळ हे दंततालव्य वर्णाने सुरु होणारे शब्द आहेत.

चहा या शब्दातील पहिले व्यंजन च् याचा उच्चार तोंडात जेथे आपण चिंच चघळतो त्या भागाला स्पर्श करून होतो म्हणून चहा हा तालव्य वर्णाने सुरु होणारा शब्द आहे.

Important Pointsवर्ण - आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात.

तालव्य वर्ण - जिभेचा स्पर्श वरच्या हिरडीवर होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना तालव्य वर्ण म्हणतात.

उदा. च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्, श्

दंततालव्य वर्ण - कठोर टाळूच्या दातांकडील खरबरीत आणि फुगीर असा जो भाग आहे त्याला वत्स असे म्हणतात आणि या भागात उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना दंततालव्य वर्ण म्हणतात. च्, छ्, ज्, झ् या वर्णांचा उच्चार तालव्य आणि दंततालव्य असा दुहेरी होतो.

Confusion Pointsआता सर्व शब्द हे च पासून सुरु होणारे आहेत परंतु येथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी अशी की मराठीत आपण दोन प्रकाराने च चा उच्चार करतो एक म्हणजे चहा मधला च आणि दुसरा म्हणजे चळवळ मधला च. अशा प्रकारे चहा मधला च हा तालव्य वर्णाने सुरु होणारा शब्द आहे.

मराठी वर्णमाला Question 6:

मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत.

  1. 48
  2. 34
  3. 12
  4. 40

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : 34

मराठी वर्णमाला Question 6 Detailed Solution

उत्तर व स्पष्टीकरण - 34

मराठी वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत.

व्यंजने म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार स्पष्टपणे होण्यासाठी स्वरांची गरज भासते त्या वर्णाना व्यंजने म्हणतात. 
व्यंजने-

क वर्ग – क,ख,ग,घ,ङ्.

च वर्ग – च,छ,ज,झ,ञ्.

ट वर्ग – ट,ठ,ड,ढ,ण.

त वर्ग – त,थ,द,ध,न.

प वर्ग – प,फ,ब,भ,म.

य वर्ग – य,र,ल,व,श,ष,स,ह,ळ.

मराठी वर्णमाला Question 7:

चंद्र अणि जग या दोन्ही शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ? 

  1. ओष्ठ्य
  2. तालव्य
  3. कंठ्य
  4. दंततालव्य 

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : तालव्य

मराठी वर्णमाला Question 7 Detailed Solution

उत्तर- चंद्र व जागृती या शब्दांतील पहिली व्यंजने तालव्य या प्रकारची आहेत. 

चंद्र व जग या शब्दांतील पहिली व्यंजने च् आणि ज् यांचा उच्चार तोंडात जेथे आपण चिंच चघळतो त्या भागाला स्पर्श करून होतो म्हणून च् आणि ज् तालव्य वर्ण आहेत.

Key Pointsतालव्य वर्ण - जिभेचा स्पर्श वरच्या हिरडीवर होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना तालव्य वर्ण म्हणतात.

उ दा. च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्, श्

दंततालव्य वर्ण - कठोर टाळूच्या दातांकडील सरबरीत आणि फुगीर असा जो भाग आहे त्याला वत्स असे म्हणतात आणि या भागात उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना दंततालव्य वर्ण म्हणतात.

च्, छ्, ज्, झ् या वर्णांचा उच्चार तालव्य आणि दंततालव्य असा दुहेरी होतो.

Additional Information ओष्ठ्य वर्ण - दोन्ही ओठांमधून निर्माण होणाऱ्या वर्णांना ओष्ठ्य वर्ण असे म्हणतात.      

उदा. प्, फ् ब्, भ्, म्

मूर्धन्य वर्ण - जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना मूर्धन्य वर्ण म्हणतात.

उदा. ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, ष्, ळ्

कंठ्य वर्ण - पडजीभ आणि जिभेची मागील बाजू या दोन्हीच्या संयोगातून निर्माण होणारे वर्ण म्हणजे कंठ्य वर्ण होय.

उदा. क्, ख्, ग्, घ्, ङ्

मराठी वर्णमाला Question 8:

अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या ______ स्वर येतो.

  1. अगोदर
  2. येतच नाही
  3. यापैकी नाही
  4. नंतर

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : अगोदर

मराठी वर्णमाला Question 8 Detailed Solution

उत्तर- अगोदर 
Key Points
  • अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो, म्हणून त्यांना 'स्वरादी' असे म्हणतात.
  • स्वरादी म्हणजे स्वर आहे आदि म्हणजे आरंभी ज्याच्या.
Additional Information
  • वर्ण- आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. 
  • स्वर- ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना 'स्वर' असे म्हणतात.

मराठी वर्णमाला Question 9:

कृ हे जोडाक्षर कसे तयार झाले आहे?

  1. क्र आणि ऊ यांच्या संयोगातून
  2. क आणि ऋ यांच्या संयोगातून
  3. क आणि रू यांच्या संयोगातून
  4. कु आणि र यांच्या संयोगातून

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : क आणि ऋ यांच्या संयोगातून

मराठी वर्णमाला Question 9 Detailed Solution

उत्तर- कृ हे अक्षर क आणि ऋ यांच्या संयोगातून तयार झाले आहे.

कृ = क् + 

क् या व्यंजनात ऋ हा स्वर मिळवून कृ हे अक्षर तयार होते

Important Pointsअक्षर = व्यंजन + स्वर = क् + अ = क

अक्षर - आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. बोलणे नष्ट होते पण लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते म्हणून या सांकेतिक खुणांना अक्षर असे म्हणतात. मूलध्वनीपासून अक्षर तयार होते.

जोडाक्षर = व्यंजन + व्यंजन + स्वर = क् + ष् + अ = क्ष

मराठी वर्णमाला Question 10:

पुढीलपैकी बाराखडीत 'ए' स्वराचे चिन्ह कोणते?

  1. ि

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : े

मराठी वर्णमाला Question 10 Detailed Solution

स्पष्टीकरण-

मराठी बाराखडी- 

मराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. देवनागरीतील स्वरांची चिन्हे (स्वरांशचिन्हे उदा. काना, मात्रा, उकार, वेलांटी इ.) व्यंजनांच्या चिन्हांना जोडून तयार होणाऱ्या व्यजनाक्षरांच्या संचाला बाराखडी असे म्हणतात.

ह्यांत मराठी भाषेत वापरण्यात येणारे स्वर आणि त्यांपैकी काही स्वरांचे ऱ्हस्व-दीर्घ असे भेद तसेच काही स्वरावलंबी धर्म ह्यांच्या चिन्हांचा समावेश असतो.

स्वर स्वरांशाचे चिन्ह स्वरांश चिन्हाचे नाव
- -
काना
ि पहिली वेलांटी/ ऱ्हस्व इकार
दुसरी वेलांटी/ दीर्घ इकार
पहिला उकार/ ऱ्हस्व उकार
दुसरा उकार/ दीर्घ उकार
मात्रा/ एक मात्रा
दोन मात्रा
ओकार
औकार
अंं अनुस्वार
अः विसर्ग

 

अशाप्रकारे बाराखडीत 'ए' स्वराचे चिन्ह  ेे  हे आहे.

Get Free Access Now
Hot Links: teen patti club teen patti glory teen patti master 2024 teen patti rich teen patti all games